जखमींचा गोविंदांचा आकडा ३७६ वर

जखमींचा गोविंदांचा आकडा ३७६ वर
Published on

जखमी गोविंदांचा आकडा ३७६ वर
५३ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईत दहीहंडीचे थर रचताना तब्बल ३७६ गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी ५३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ३७ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. २८६ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांवर उपचार सुरू आहेत. मुंबई शहरातील रुग्णालयांमध्ये सर्वाधिक १८३ जखमी गोविंदा उपचारासाठी आले आहेत. त्यापैकी २९ जणांना दाखल करण्यात आले असून, २३ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत आणि १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पूर्व उपनगरातील रुग्णालयांत ६२ जखमी गोविंदा उपचारासाठी आले असून, त्यापैकी ११ जणांना दाखल करण्यात आले. ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पश्चिम उपनगरातील रुग्णालयांमध्ये १२६ जखमी गोविंदा उपचारासाठी आले असून, त्यापैकी नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १४ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत, तर १०३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
...
महापौरांनी घेतली भेट
मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी रुग्णालयांना भेट देत जखमी गोविंदांची विचारपूस केली. महापौर तावडे यांनी केईएम रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या गोविंदांची तसेच त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. या वेळी जखमींना प्राधान्याने, वेळेत आणि दर्जेदार उपचार देण्याचे निर्देश त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. हरीश भांदिर्गे यांनी केईएम आणि राजावाडी रुग्णालयांना भेट देऊन जखमी गोविंदांची प्रकृती जाणून घेतली. उपचार किंवा मदतीबाबत अडचण असल्यास जखमी गोविंदांनी संपर्क साधावा, असे आवाहन भांदिर्गे यांनी केले आहे.
...
कोठे किती रुग्ण?
१. जखमींची सर्वाधिक संख्या केईएम रुग्णालयात ७६ इतकी नोंदविण्यात आली. १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
२. नायर रुग्णालयात ३२ जखमी गोविंदा उपचारासाठी आले. त्यापैकी तीन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३. सायन रुग्णालयात १८ जखमी गोविंदा उपचारासाठी आले. चार जणांना दाखल करण्यात आले आहे आणि आठ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४. राजावाडी रुग्णालयात ३३ जखमी गोविंदा उपचारासाठी आले. १५ जणांना दाखल करण्यात आले आहे. १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५. बीडीबीए रुग्णालयात १८ जखमी गोविंदांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी दोन जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
६. एचबीटी ट्रॉमा रुग्णालयात ३४ जखमी गोविंदा उपचारासाठी आले. त्यापैकी दोन जणांना दाखल करण्यात आले आहे. ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
७. व्ही. देसाई रुग्णालयात ३३ जखमी गोविंदा उपचारासाठी आले होते. या सर्व ३३ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com