चारकोप, गोराईतील बैठ्या चाळींचा होणार कायापालट!

चारकोप, गोराईतील बैठ्या चाळींचा होणार कायापालट!
Published on

चारकोप, गोराईतील बैठ्या चाळींचा होणार कायापालट!
४०१ एकर क्षेत्रफळाचा समूह पुनर्विकास करण्याची म्हाडाची योजना; ३२ हजार ४७६ रहिवाशांना मिळणार मोठे घर
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : चारकोप आणि गोराईतील बैठ्या चाळींचा आता समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून कायापालट होणार आहे. गोराई आणि चारकोप येथे सुमारे ४०१ एकर क्षेत्रफळाचे म्हाडाचे लेआऊट असून, त्यावर बैठ्या चाळी आहेत. या चाळी जीर्ण झाल्याने त्याचा समूह पुनर्विकास करण्याची म्हाडाची योजना आहे. त्याचा येथील तब्बल ३२ हजार ४७६ रहिवाशांना लाभ मिळणार असून, सध्या असलेल्या क्षेत्रफळाच्या किमान सव्वा दोन पट एरिया मिळू शकणार आहे. त्याबाबतचा आराखडा म्हाडाकडून लवकरच तयार करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
कामाठीपुरा, अभ्युदयनगर, मोतीलालनगरनंतर आता म्हाडाने पश्चिम उपनगरातील चारकोप आणि गोराई येथील लेआऊटवर असलेल्या चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. चारकोप येथे २१७ एकरांचा लेआऊट असून, त्यावर बैठ्या चाळी असून, त्यामध्ये जवळपास ११ हजार ९६२ घरे आहे, तर गाराई येथे १९४ एकरांचा लेआऊट असून, त्यामध्ये २० हजार ५१४ घरे आहेत. सदर घरे असलेल्या प्लाॅटचे २५० ते १००० हजार चौरस फूट एवढे क्षेत्रफळ आहे. या दोन्ही लेआऊटची समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून नव्याने उभारणी केली जाणार आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहीती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

प्रस्‍ताव पाठवणार
- म्हाडा चारकोप आणि गोराईच्या समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारच्या मंजुरीला पठवणार आहे. त्याची तपासणी करून राज्य सरकारकडून त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला जाईल.
- शासन निर्णयाच्या अनुषंगाने म्हाडा पुन्हा सखोल आराखडा तयार करून उच्चाधिकार समितीला पाठवेल. त्यानंतर त्याला सरकारने अंतिम मंजुरी दिल्यानंतर बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ॲण्ड डीए) नियुक्तीसाठी निविदा काढल्या जातील.

म्हाडाला बांधीव क्षेत्रफळ मिळणार
समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून म्हाडाने चारकोप आणि गोराईचा कायापालट केल्यानंतर संबंधित रहिवाशांना सध्या असलेल्या क्षेत्रफळाच्या किमान सव्वादोन पट क्षेत्रफळ मिळणार आहे, तर म्हाडाला बांधकाम आणि विकास संस्थेकडून मोठ्या प्रमाणात बांधीव क्षेत्रफळ उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याची भविष्यात लाॅटरीच्या माध्यमातून विक्री करता येईल.


गोराई
- भूखंड - २१७ एकर
- रहिवासी - ११ हजार ९६२
- २५०-१००० चौरस फूट प्लाॅटचे क्षेत्रफळ

चारकोप
- भूखंड - १९४ एकर
- रहिवासी - २० हजार ५१४
- २५० ते १००० चौरस फुटांचे प्लाॅट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com