

‘जे. कुमार’ने लावली १८,९६२ झाडे
मुंबई, ता. ७ : पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करताना पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सने या आर्थिक वर्षात देशभरातील आपल्या प्रकल्पस्थळी १८,९६२ झाडे लावली आणि ४,४८९ झाडांचे पुनर्रोपण केले.
मुंबई, अहमदाबाद, सुरत आणि पुणे येथील मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करताना कंपनीने झाडांची तोड टाळण्यासह पर्यावरण संवर्धन केले. ठाण्यातील आनंद साकेत रोड प्रकल्पात ३१ झाडांवर परिणाम झाल्यानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कंपनीने ३१० खारफुटीची झाडे लावली. कंपनीने आपल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजनांचा अवलंब करत बीएस-६ बांधकाम उपकरणांचा वापर वाढवला आहे. भूमिगत बोगदा प्रकल्पांमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यात येत आहे. तसेच, कंपनीने आपल्या सर्व प्रकल्पस्थळी जुन्या प्रकाशयंत्रणा बदलून कमी वीज वापरणारे एलईडी दिवे बसवले आहेत. या उपाययोजनांमुळे कंपनीच्या स्कोप एक आणि स्कोप दोन उत्सर्जनाची तीव्रता कमी झाली, असे जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कमल जे. गुप्ता म्हणाले. या आर्थिक वर्षातील कंपनीची उलाढाल ५,७२३.०३ कोटी रुपये आहे. कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आरोग्यसेवा, व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षण यांसारख्या उपक्रमांचा लाभ यंदा सुमारे २५ हजार नागरिकांना झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.