

‘कार्बन क्रेडिट’ची शेतीला जोड
मुंबई, ता. ८ : शेतीला आर्थिक मूल्य मिळवून देण्यासाठी ‘ओपन नेटवर्क फॉर कार्बन मार्केट्स’तर्फे (ओएनसीएम) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी वनीकरण, कमी मशागत आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांसारख्या पद्धतींमधून निर्माण होणाऱ्या कार्बन क्रेडिटची विक्री सुलभ करण्यासाठी खुली डिजिटल पायाभूत व्यवस्था विकसित केली जात आहे.
सध्या कार्बन क्रेडिट बाजारपेठेत सहभागी होण्यासाठी प्रकल्प नोंदणी, कार्बन शोषणाचे मोजमाप, अहवाल, पडताळणी, प्रमाणन आणि क्रेडिट विक्री अशा अनेक प्रक्रियांमधून जावे लागते. विविध संस्था व मध्यस्थांमुळे खर्च वाढत असल्याने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी या बाजारपेठेत थेट सहभागी होणे अवघड ठरते. ओएनसीएमच्या माध्यमातून कार्बन बाजारपेठेतील विविध प्रक्रिया डिजिटल पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न आहे. यामुळे व्यवहाराचा खर्च कमी होणे, किंमत व देयकांमध्ये पारदर्शकता येणे आणि कार्बन क्रेडिटमधून निर्माण होणारे आर्थिक मूल्य शेतकऱ्यांपर्यंत अधिक थेट पोहोचणे शक्य होईल.
भारत कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजनेच्या (सीसीटीएस) माध्यमातून कार्बन बाजारपेठेसाठी व्यापक चौकट विकसित करत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कृषी, कृषी वनीकरण आणि ग्रामीण प्रकल्पांना ओएनसीएमशी जोडल्यास विशेषतः लहान शेतकऱ्यांचा सहभाग वाढू शकतो, असे ‘नेटवर्क्स फॉर ह्युमॅनिटी’चे सहसंस्थापक सुजित नायर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.