सायन रुग्णालयात ‘एचएमआयएस’ पथदर्शी प्रयोग

सायन रुग्णालयात ‘एचएमआयएस’ पथदर्शी प्रयोग
Published on

सायन रुग्णालयात ‘एचएमआयएस’ पथदर्शी प्रयोग
दररोज १५ हजार बाह्यरुग्णांच्या डिजिटल नोंदणीला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयात (सायन रुग्णालय) हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (एचएमआयएस) पथदर्शी प्रयोग मंगळवारी (ता. ८) सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत सध्या बाह्यरुग्ण विभागातील नोंदणी प्रक्रिया डिजिटल करण्यात आली असून, नोंदणी शुल्क भरण्यासाठी यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एचएमआयएस या प्रकल्पाची पाहणी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मंगळवारी केली. रुग्णालयातील एचएमआयएसच्या प्रत्यक्ष वापराची माहिती त्यांनी घेतली तसेच रुग्ण आणि नातेवाइकांना ही प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. सायन रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे  १५ हजार रुग्णांची नोंदणी  होते. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांची नोंदणी डिजिटल पद्धतीने केल्याने नोंदणी प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रुग्णांच्या नोंदणीसाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर नोंदणी शुल्क भरण्यासाठी बाह्यरुग्ण विभागात  १० पीओएस मशीन  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रोख रकमेऐवजी डिजिटल पद्धतीने शुल्क भरण्याचा पर्याय रुग्णांना मिळणार आहे. सध्या एचएमआयएसच्या पहिल्या टप्प्यात बाह्यरुग्ण विभागातील नोंदणीवर भर देण्यात आला आहे. पुढील टप्प्यात रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, डॉक्टरांचे निदान व उपचाराची नोंद तसेच विविध तपासण्यांची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया राबविण्याचे नियोजन आहे.

बदलाचा पहिला टप्पा
एचएमआयएस प्रणालीचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून तिची चाचणी घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सायन रुग्णालयातील एचएमआयएसचा हा प्रयोग  रुग्णालयातील कागदी प्रक्रियेतून डिजिटल व्यवस्थेकडे होणाऱ्या बदलाचा पहिला टप्पा  मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com