नोंदणी प्रक्रियेतील गोंधळाविरोधात आंदोलन

नोंदणी प्रक्रियेतील गोंधळाविरोधात आंदोलन
Published on

नोंदणी प्रक्रियेतील गोंधळाविरोधात आंदोलन
‘एमएमसी’ कार्यालयात हनुमान चालीसा पठण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या (एमएमसी) चिंचपोकळी येथील कार्यालयात नोंदणी प्रक्रियेतील कथित गोंधळ आणि विलंबाच्या निषेधार्थ इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनच्या (नॅशनल) वतीने सात वेळा हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. एमएमसी कार्यालयातील नकारात्मकता दूर व्हावी आणि संबंधितांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल व्हावा, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल आंबेकर यांनी सांगितले.

एमएमसीकडून नोंदणी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काही प्रकरणांमध्ये दोन किंवा तीन वेळा नोंदणी झाल्याने गोंधळ निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, नोंदणी प्रक्रियेला विलंब होत असल्याने प्रलंबित अर्जांचा बॅकलॉग वाढल्याचेही संघटनेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एमएमसी कार्यालयात सात वेळा हनुमान चालीसाचे पठण केले. नोंदणी प्रक्रियेला गती मिळावी, झालेल्या चुका दुरुस्त व्हाव्यात आणि प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा निघावा, ही या आंदोलनामागील प्रमुख मागणी होती. आंबेकर यांनी सांगितले की, आंदोलनानंतर एमएमसी प्रशासनाने नोंदणी प्रक्रियेचा वेग वाढविण्याची ग्वाही दिली आहे. प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यात येतील. तसेच, प्रलंबित नोंदणीचा बॅकलॉग किती दिवसांत संपुष्टात आणला जाईल, याबाबत लवकरच वेळमर्यादा निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com