अस्वच्छतेमुळे अन्न परवाने निलंबित

अस्वच्छतेमुळे अन्न परवाने निलंबित
Published on

अस्वच्छतेमुळे अन्न परवाने निलंबित
‘आयआरसीटीसी’ बेस किचन, ‘इस्कॉन’वर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या मुंबईतील अन्न आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. आयआरसीटीसीअंतर्गत रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या बेस किचनपासून जुहू येथील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांपर्यंत तसेच झेप्टो, हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

आयआरसीटीसीअंतर्गत रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या मुंबई परिसरातील पाच बेस किचन आणि फूड प्लाझाची तपासणी करण्यात आली. यामध्ये कुर्ला येथील आर. के. असोसिएट्स अँड हॉटेलियर्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला, तर चार आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. तपासणीत झुरळांचा सुळसुळाट, उघडे अन्नपदार्थ, अस्वच्छ उपकरणे, तुटलेल्या फरशा आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेतील गंभीर त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. जुहू येथील इस्कॉनच्या तीन अन्न आस्थापनांवरही एफडीएने कारवाई केली आहे. याठिकाणी गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधित परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये इस्कॉनच्या रेस्टॉरंट आणि गोविंदाज रेस्टॉरंटचाही समावेश आहे.

मालाड पश्चिम येथील झेप्टोच्या आस्थापनेचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे. याशिवाय घाटकोपरमधील बॉम्बेज द फूड फ्युजन कॅफे, बोरिवलीतील श्री मधुरम, मुलुंडमधील कोठारी स्वीट आणि मुलुंड फरसाण मार्ट, तसेच गोरेगावमधील महाराष्ट्र बिर्याणी सेंटर यांच्याविरोधातही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळल्याने नियामक कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com