मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्रिपाठी

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्रिपाठी
Published on

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्रिपाठी
राज्यपालांच्या उपस्थितीत लोक भवनात गोपनीयतेची शपथ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांनी बुधवारी (ता. ९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्या. त्रिपाठी हे मुंबई उच्च न्यायालयाचे ५०वे मुख्य न्यायमूर्ती असणार आहेत.


राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन येथील कार्यक्रमात त्रिपाठी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह काही कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य खंडपीठातील सर्व न्यायमूर्तीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. अलाहाबाद उच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असलेल्या न्या. त्रिपाठी यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली होती. त्रिपाठी यांनी १९९० मध्ये लखनऊ विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर ११ जानेवारी १९९२ मध्ये वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी प्रामुख्याने दिवाणी (सिव्हिल) प्रकरणांमध्ये वकिली केली आणि ऑक्टोबर २००७ पासून ते उत्तर प्रदेश राज्याचे ‘अतिरिक्त मुख्य स्थायी वकील’ म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २७ सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून आणि १० एप्रिल २०१५ला त्यांनी कायमस्वरूपी म्हणून शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com