

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची लगबग
रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या कामांना वेग
मुंबई, ता. १० ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त, नागरिक तसेच गणेश मंडळांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध नागरी सुविधा व पूर्वतयारीची कामे पालिकेने युद्धपातळीवर सुरू केली आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
गणेशोत्सवाच्या तयारीचा भाग म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात येत आहे. स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जनाच्या कालावधीत दरवर्षी उभारण्यात येणाऱ्या छावणीची पाहणी करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक तसेच गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणावर होणारी वर्दळ लक्षात घेता, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
गणेशभक्तांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत वातावरणात गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय राखून कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे पालिकेच्या सूत्राने सांगितले. प्रभाग क्रमांक २१७चे नगरसेवक ॲड. गौरांग झवेरी यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी नियमित धूर फवारणी तसेच कीटकनाशक फवारणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष
विभागवार रस्ते दुरुस्ती, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि धोकादायक झाडांची छाटणी यांसारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.