अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उपोषण

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उपोषण
Published on

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उपोषण
पोषण आहाराच्या दर्जासह दरवाढीसाठी मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुलांसह गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा सुधारावा तसेच महागाईच्या प्रमाणात प्रत्येक लाभार्थ्यामागील आहाराच्या दरात वाढ करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सशी (सीआयटीयू) संलग्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. ९) आझाद मैदानात एकदिवसीय उपोषण केले.

महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सीआयटीयू) वतीने हे आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे ‘टेक होम रेशन’ (टीएचआर) देणे तातडीने बंद करून अंगणवाडी केंद्रातील ताजे आणि पौष्टिक अन्न उपलब्ध करून द्यावे, सध्या लाभार्थ्यांसाठी असलेले आहाराचे दर वाढत्या महागाईच्या तुलनेत अत्यंत अपुरे आहेत. त्यामुळे उपलब्ध दरात लाभार्थ्यांना पुरेशा पोषणमुल्याचा आहार देणे कठीण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ‘सीआयटीयू’ सरचिटणीस संगीता कांबळे यांनी सांगितले की, ‘बुधवारी सायंकाळी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत ‘टेक होम रेशन’चा प्रश्न ऑक्टोबरपर्यंत सोडवण्यात येईल आणि त्यामध्ये बदल करण्यात येईल, आहाराच्या दराबाबत मात्र हा निर्णय त्यांच्या अधिकारात नसून मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेऊ शकतात,’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा केंद्र सरकारकडे कसा पुढे नेता येईल, याबाबत प्रयत्न करणार आहोत,” असे कांबळे यांनी सांगितले.

‘लाडकी बहीण’चे मानधन द्या!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) सुविधा लागू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अर्ज भरण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचे मानधन तातडीने द्यावे, प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करावा तसेच कुपोषणाच्या समस्येवर ठोस उपाययोजना कराव्यात, या मागण्याही आंदोलनकर्त्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com