

‘सोना सिलेक्शन’चा आयपीओ १७ ते २१ सप्टेंबरला बाजारात
मुंबई, ता. १० : फॅब्रिक आणि कपड्यांचे उत्पादन करणारी कंपनी सोना सिलेक्शन इंडियाचा आयपीओ १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान बाजारात येत आहे. त्यासाठी ९४ ते ९९ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
या आयपीओसाठी १५० शेअरसाठी व त्यापुढे १५० शेअरच्या पटीतच बोली लावता येईल. हा आयपीओ सुमारे १४१ कोटी रुपयांचा आहे. आयपीओच्या रकमेपैकी ८० कोटी रुपये जुन्या कर्जांच्या परतफेडीसाठी वापरले जातील, तर ५० कोटी रुपये उत्पादन प्रक्रियेच्या विस्तारासाठी वापरले जातील. कंपनी साध्या कापडाचे रूपांतर उच्च गुणवत्तेच्या फॅब्रिकमध्ये करते. कॉटन फॅब्रिक, कॉटन लाईक्रा (स्ट्रेचेबल), कॉटन ब्लेंड्स, पॉलिएस्टर ब्लेंडस, पॉलिएस्टर फॅब्रिक यांच्या उत्पादन प्रक्रियेत कंपनीचा हातखंडा आहे. राजस्थानातील भीलवाडा येथे कंपनीचा उत्पादन प्रकल्प आहे. येथील वार्षिक उत्पादन क्षमता आठ कोटी २४ लाख मीटर आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांनी ८२ टक्के उत्पादन क्षमता वापरून सहा कोटी ८० लाख मीटर कापडनिर्मिती केली. या वर्षात कंपनीने आपली उपकंपनी सीयोना एंटरप्राईजेसमार्फत रेडीमेड गारमेंट क्षेत्रात व्यवसाय विस्तार केला आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांचा महसूल ५१६ कोटी रुपये होता. दोन वर्षांपूर्वी तो १२० कोटी रुपये होता. या वर्षातील त्यांचा करोत्तर नफा ३४ कोटी होता. दोन वर्षांपूर्वी तो १३ कोटी रुपये होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.