

हीरो मोटर्स आयपीओचा ७९ ते ८४ रुपये किंमतपट्टा
मुंबई, ता. १० : वेगवेगळ्या वाहन उत्पादक कंपन्यांना वाहनातील इंजिनांशी संबंधित वेगवेगळे भाग बनवून देणारी कंपनी हीरो मोटर्सचा आयपीओ १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान बाजारात येत आहे.
एक हजार कोटी रुपयांचा हा आयपीओ असून त्यासाठी ७९ ते ८४ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बीएमडब्ल्यू, डुकाटी मोटर्स होल्डिंग, फॉर्म्युला मोटर्स स्पोर्ट्स, हमिंगबर्ड, एचडब्ल्यूए या वाहन उत्पादक कंपन्या तसेच जगात इलेक्ट्रिक सायकली बनवणाऱ्या कंपन्या यांच्यासह अवकाश अंतराळ क्षेत्रासाठीदेखील हीरो मोटर्स कंपनी विविध उपकरणे बनवून देते. कंपनीने यासाठी जगभरातील मान्यवर कंपन्यांशी सहकार्य केले असून त्यांचा सात टक्के महसूल संशोधन आणि विकास क्षेत्रावर खर्च होतो. सीव्हीटी, इलेक्ट्रिक व्हेकल ट्रान्समिशन, इलेक्ट्रिक मोटर्स, इंटिग्रेटेड ड्राइव्ह युनिट्स आणि गिअर सेट्स बनवण्यात कंपनीची ख्याती आहे. फोर्जिंग तंत्रज्ञानासाठीदेखील त्यांनी जगभरातील ख्यातनाम कंपन्यांशी भागीदारी केली आहे. हीरो मोटर्सच्या सहा कंपन्या असून त्यांचा हा सगळा एकत्रित आयपीओ आहे. लवकरच जपानी कंपनीसह संयुक्तपणे जगात विक्रीसाठी मोटारही तयार केली जाईल, असे अध्यक्ष पवन मुंजाळ म्हणाले.
आयपीओमधील पन्नास टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, तर ३५ टक्के वाटा छोट्या गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. १५ टक्के वाटा बिगर संस्थात्मक बड्या गुंतवणूकदारांना मिळेल. या आयपीओमध्ये १७८ शेअरसाठी व त्यापुढे १७८ शेअरच्या पटीत गुंतवणूक करता येईल. आयपीओमधील रकमेतून १९० कोटी रुपये जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. २०० कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरले जातील. त्यातून उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगरमधील प्रकल्पाचा विस्तार केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.