

कामाठीपुरा समूह पुनर्विकास
आराखड्याचे आज सादरीकरण
प्रकल्पाची संकल्पना, व्याप्ती स्पष्ट होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या नियोजित आराखड्याचे शुक्रवारी (ता. ११) रहिवाशांसमोर सादरीकरण केले जाणार आहे. कामाठीपुरा विकास अखिल पद्मशाली समाज, भावना बाग, कामाठीपुरा, सहावी गल्ली, मुंबई येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पाची संकल्पना, प्रकल्पाची व्याप्ती, पुनर्वसनाचे नियोजन, लाभार्थी, प्रस्तावित पायाभूत व नागरी सुविधा, पर्यावरणपूरक उपाययोजना तसेच परिसराच्या भविष्यातील विकासाचे नियोजन स्पष्ट होणार आहेत.
कामाठीपुरा हा मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे. अनेक दशकांचा वारसा लाभलेल्या या परिसरातील जुन्या व जीर्ण इमारतींचा नियोजित पद्धतीने पुनर्विकास करून रहिवाशांना सुरक्षित, आधुनिक आणि सुसज्ज निवासव्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच परिसराचा सर्वांगीण शहरी विकास साधणे, हा या समूह पुनर्विकास प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी समूह पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी मे. भागीरथी हाउसिंग प्रा.लि. व माथी डेव्हलपर्स प्रा.लि. यांची बांधकाम आणि विकास संस्था (सी अँड डीए) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.