

एसएस रिटेलचा आयपीओ
४०३ ते ४२४ रु. किंमत
मुंबई, ता. १० : मोबाईल आणि मोबाईलशी संबंधित विविध साहित्य आणि लॅपटॉप वगैरे अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकणारी रिटेल दुकान साखळी एसएस रिटेलचा आयपीओ १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान बाजारात येत आहे. त्यासाठी ४०३ ते ४२४ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
हा इशू ५३६ कोटी रुपयांचा आहे. यातून देशभरात नवी दुकाने उघडण्यासाठीचा भांडवली खर्च भागवला जाईल. कंपनीची देशात ५००पेक्षा जास्त दुकाने असून त्यातील ४५८ दुकाने महाराष्ट्रात आहेत. त्याखेरीज मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात येथेही त्यांची दुकाने आहेत. मोबाईल रिटेल चेन म्हणून ही कंपनी देशात तिसऱ्या क्रमांकाची तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाची आहे. दुकानांच्या आकारमानाचा विचार केल्यास प्रतिचौरस फुटामागे त्यांचा महसूल एक लाख ४६ हजार रुपये आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासारखी श्रीमंत महानगरे तसेच दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या श्रेणीची शहरे आणि ग्रामीण भाग असल्याने महाराष्ट्राच्या बाजारपेठेत यश मिळवणे देशातच सगळ्यात कठीण आहे. ते मिळवल्यानंतर इतरत्र जाणे सोपे होते. त्यानुसार आता आम्ही हळूहळू देशातही आमचा व्याप वाढवत आहोत, असे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ शहा म्हणाले. इतर दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर एक वर्षाची वॉरंटी मिळते. तर आम्ही दोन वर्षांची वॉरंटी देतो. आम्ही ग्राहकांना ईएमआयवर खरेदी करता यावी, यासाठी बड्या वित्तसंस्थांशी सहकार्य केले आहे, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.