

बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर!
सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे; एक रेक आयसीएफमध्ये परतणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईच्या गर्दीच्या लोकलमध्ये दरवाजाला लटकून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना अधिक सुरक्षित पर्याय मिळण्याची आशा पुन्हा लांबणीवर पडली आहे. स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन-एसी क्लोज्ड-डोअर लोकलच्या सुरक्षा चाचणीतच तांत्रिक आणि यांत्रिक अडचणी आढळल्याने प्रवाशांना या लोकलसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चाचणीसाठी गेलेला एक रेक आवश्यक सुधारणांसाठी चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीकडे (आयसीएफ) परत पाठविण्यात येणार आहे. दुसरा रेक कुर्ला कारशेडमध्येच उभा आहे. या लोकलची कन्फर्मेटरी ऑसिलोग्राफ कार रन (सीओसीआर) चाचणी रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्डस् ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमेवरील ६३.२७ किलोमीटरच्या खजुराहो-महोबा मार्गावर घेण्यात आली. त्यात काही तांत्रिक अडचणी आढळल्याने रेक निर्धारित सुरक्षा निकष पूर्ण करू शकला नाही.
सुधारणा करून पुन्हा चाचणी
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की संबंधित रेक आयसीएफमध्ये पाठवून आवश्यक तांत्रिक बदल आणि दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर रेकची पुन्हा चाचणी घेण्यात येईल. सुधारणा, पुनःचाचणी आणि आवश्यक सुरक्षा मंजुरी पूर्ण झाल्यानंतरच प्रवासी सेवेसाठी या लोकलचा विचार केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.