

पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती!
समन्वय समितीचे १२ हजार गणेश मंडळांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी येत्या गुरुवारी (ता. १७) गणरायाची विशेष महाआरती आयोजित करावी, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. पंतप्रधान मोदी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, यासाठी ही महाआरती आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी मुंबईतील सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेश मंडळांना हे आवाहन केले आहे. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिर उभारणीसह देशभरातील शेकडो तीर्थक्षेत्रांचा विकास झाला असून, हिंदू संस्कृतीचा जगभरात गौरव वाढला आहे, असा दावा समितीने केला आहे. तसेच राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिल्याबद्दल समितीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
----
आयोजन करणाऱ्यांना विशेष पारितोषिके
उत्कृष्ट महाआरतीचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ५१ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय घरगुती गणेशोत्सवासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व गणेश मंडळे तसेच नागरिकांनी महाआरतीचे फोटो व व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन समितीचे प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.