परवानग्यांचा घोळ कायम!

परवानग्यांचा घोळ कायम!
Published on

परवानग्यांचा घोळ कायम!
गणेशोत्‍सव मंडळांचे १,०५२ अर्ज प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः गणेशोत्सव दोन दिवसांवर आला तरी गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानग्यांचा घोळ कायम आहे. अनेक मंडपांमध्ये गणरायाच्या मूर्ती दाखल झाल्‍या तरी अनेक मंडळांना मंडपांच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. मुंबई शहर आणि उपनगरांत मंडपांच्या परवानगींचे तब्बल १,०५२ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. त्‍यामुळे शहरातील गणेशोत्सव मंडळांची तारांबळ उडाली आहे.
परवानगी न मिळाल्याने गणेशोत्‍सव मंडळांमधून पालिका प्रशासनावर नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसते. गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यापूर्वी महापालिका, वाहतूक पोलिस, अग्निशमन दल यांसह विविध यंत्रणांच्या परवानग्या घेणे आवश्यक असते. त्यामुळे एकाच परवानगी प्रक्रियेत अनेक विभागांचा सहभाग असताना अर्जांच्या छाननीला विलंब होत असल्याचे चित्र आहे. उत्सव अगदी जवळ आला असून मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित राहिल्याने मंडप उभारायचे की नाही, याबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळेत अर्ज दाखल करूनही परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. परवानगीसाठी विविध विभागांकडे हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार मंडळांकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘एक खिडकी’ पद्धतीने परवानगी प्रक्रिया राबविण्याची मागणी पुन्हा
जोर धरू शकते.

पालिकेचे म्‍हणणे काय?
गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी, विद्युत व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक नियोजन अशी कामे वेळेत पूर्ण करावी लागतात. मात्र १,०५२ अर्ज प्रलंबित असल्याने शेवटच्या टप्प्यात प्रशासनावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी परवानग्या देताना घाईगडबड होऊन नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते का, याबाबतची चाचणी करावी लागत असल्याने प्रशासनावरही ताण वाढत असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

एकूण अर्ज प्राप्त : २,६७०
मंजूर अर्ज : १,२३९
प्रलंबित अर्ज : १,०५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com