मार्चपर्यंत देशातील टोलनाके फाटकमुक्त

मार्चपर्यंत देशातील टोलनाके फाटकमुक्त
Published on

मार्चपर्यंत देशातील टोलनाके फाटकमुक्त
‘फिनटेक फेस्ट’मध्ये नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

मुंबई, ता. ११ : ‘देशातील सर्व टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आठ महिन्यांत बंद होणार आहेत. डिसेंबरपर्यंत ७० टक्के टोलनाक्यावरील फाटके बंद होतील तर मार्चपर्यंत सर्व टोलनाके फाटकमुक्त होतील,’ असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. ११) येथे ‘फिनटेक फेस्ट’मध्ये सांगितले.

‘सध्या सर्व वाहनांवर फास्ट टॅग असले तरी टोलनाक्यावर त्यातून रक्कम वजा होण्यास दहा ते पंधरा सेकंदांपर्यंतचा कालावधी लागतो. त्यामुळे तेथील फाटक आणि गतिरोधक याच्यासाठी वाहनांना थांबावे लागते, अशा स्थितीत तेथे मोठ्या रांगा लागतात; मात्र आता टोलनाक्याआधीच फास्टटॅगमधील शिल्लक तपासून रक्कम वळती करणारी यंत्रणा बसवण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष टोलनाक्यावर वाहनांना थांबावे लागणार नाही. या नव्या पद्धतीमुळे सरकारला दरवर्षी आणखीन पंचवीस हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल,’ असेही गडकरी यांनी सांगितले. ‘फास्टटॅगमुळे आधीच सरकारचा महसूल दहा टक्क्यांनी वाढला आहे. सध्या देशातील सर्व टोलनाक्यांवरून ८२ हजार कोटी रुपये दरवर्षी वसूल केले जात आहेत. टोलनाक्यांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी उत्पन्नाच्या १२ टक्के रक्कम याआधी खर्च होत होती. फास्टटॅगनंतर हे प्रमाण दोन ते तीन टक्क्यांवर आले आहे. आता टोलनाक्यावर थांबावे लागले नाहीत, त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाचेल. यामुळे वार्षिक पाच हजार कोटी रुपयांचे इंधन वाचेल,’ असा अंदाज असल्याचेही गडकरी म्हणाले.

ओव्हर लोडिंगवर उपाय शोधा!
‘अनेक मालवाहू ट्रक क्षमतेपेक्षा जास्त माल भरतात. त्यामुळे अपघात होऊन रस्त्यावर वाहतूक कोंडी होते आणि संसाधनांचेही नुकसान होते. हे ओव्हरलोडिंग शोधण्यासाठी तज्ज्ञांनी उपाय सुचवावा,’ असेही गडकरी या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com