मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
Published on

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
गणेशभक्तांची होणार अडचण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने प्रवासी खरेदीसाठी बाहेर पडत असताना रविवारी (ता. १३) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण अप-डाऊन जलद मार्गांसह ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी, नेरूळदरम्यान विविध अभियांत्रिकी आणि सिग्नल यंत्रणेची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे रविवारी प्रवाशांना लोकलच्या वेळापत्रकात बदल आणि अतिरिक्त थांब्यांचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

मध्य रेल्वे
कुठे : ठाणे-कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद आणि अर्ध-जलद लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकलना नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, डोंबिवली आणि ठाकुर्ली येथेही थांबे देण्यात येतील. तर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद आणि अर्ध-जलद लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या लोकलना ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे अतिरिक्त थांबे असतील. त्यानंतर मुलुंड येथे त्या पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.


ट्रान्सहार्बर मार्ग
कुठे : ठाणे ते वाशी, नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकच्या कालावधीत ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यानची अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहणार आहे. ठाण्याहून वाशी, नेरूळ आणि पनवेलच्या दिशेने सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन लोकल तसेच पनवेल, नेरूळ आणि वाशीहून ठाण्याच्या दिशेने सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ या वेळेत सुटणाऱ्या अप लोकल रद्द राहतील. बेलापूर-उरण मार्गावरील लोकल सेवा मात्र रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com