

एसयूव्हीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू
कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शिवडीतील ‘कोलगेट जेट्टी’ परिसरातील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये एसयूव्ही कारच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार मोहम्मद गुड्डू खान याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
वर्कशॉपच्या वॉशिंग एरियाजवळ साजिद अली शेख हे भिंतीलगत बसले असताना १७ वर्षीय मुलाने चालवलेली एक्सयूव्ही अचानक पुढे सरकली आणि साजिद यांना धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर वर्कशॉपमध्ये अल्पवयीन मुलाला कामावर ठेवण्याबाबत आणि त्याच्याकडून वाहन चालवण्याचे काम करून घेण्याबाबत, गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. साजिदच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे, की वॉशिंगचे कंत्राट असलेल्या मोहम्मद गुड्डू खान याने त्या मुलाला कामावर घेण्यापूर्वी त्याचे वय तपासले नाही. पीडित कुटुंबाचे वकील फहाद अली कुरेशी यांनी सांगितले, की त्या कामगाराची नेमणूक आणि देखरेख यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.