

आरोग्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची : परेश रावल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : ‘फिजिओथेरपी ही केवळ आजारातून किंवा दुखापतीतून बरे होण्यासाठी महत्त्वाची नाही, तर आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी, शरीराची हालचाल चांगली ठेवण्यासाठी आणि सक्रिय व स्वावलंबी जीवन जगण्यासाठीही तिची मोठी मदत होते,’ असे मत पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केले.
‘एसव्हीकेएम’ने आपल्या समुदायासाठी स्वतंत्र फिजिओथेरपी क्लिनिक शुक्रवारी (ता. ११) सुरू केले आहे. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एसव्हीकेएमचे सह अध्यक्ष व विश्वस्त भूपेश आर. पटेल म्हणाले, की आरोग्यसेवा म्हणजे केवळ आजारावर उपचार करणे नाही, आजार टाळणे, योग्य वेळी मदत घेणे आणि निरोगी व सक्रिय जीवन जगण्यासाठी आवश्यक आधार देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या समुदायाच्या दैनंदिन जीवनात आरोग्य आणि कल्याणाला महत्त्व देणारे वातावरण तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एनएमआयएमएस स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या व्यवस्थापनाखाली सुरू होणारे हे क्लिनिक त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तज्ज्ञांची मदत आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.