

एआय स्वीकारताना जबाबदारी महत्त्वाची!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सल्ला
मुंबई, ता. ११ : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापरायचे की नाही, अशी निवड आता उरलीच नाही तर ‘एआय’ जबाबदारीने कसे वापरावे आणि त्याच्याबरोबर येणारा धोक्यांचे व्यवस्थापन कसे करावे, हा मुख्य मुद्दा आहे,’ असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सांगितले.
‘एआय’चा स्वीकार जबाबदारीने व्हावा आणि तो स्वीकार सुव्यवस्थापित असावा, सध्या एआयमुळे व्यवसायांचा आवाकाच बदलत असताना व्यावसायिकांनी आपल्या परंपरागत पद्धतींवर विसंबून राहू नये. तसे केल्यास ते अक्षम्य ठरतील आणि प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे पडतील. तसेच त्यामुळे काही धोकेदेखील उद्भवू शकतात, असा सल्लाही सीतारामन यांनी दिला. अर्थात सुरक्षा आणि उत्तरदायित्व यांना नजरेआड करून वेगाने एआय स्वीकारता येणार नाही. एआय आता स्वतःच कृती करीत असल्यामुळे त्यातून होणाऱ्या चुका, फसवणूक आणि गैरवापर यांनादेखील गांभीर्याने घेतले पाहिजे. एखाद्याच्या बाबतीत निर्णय घेण्यास एआय मदत करू शकतो; मात्र त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर आणि संस्थेवरच राहील, असेही त्या म्हणाल्या.
‘एआय’ने साहाय्य केलेल्या निर्णयांचे परिणाम जेवढे गंभीर असतील तेवढ्याच समर्थपणे त्या निर्णयाचे मानवी मूल्यमापनदेखील झाले पाहिजे. तसेच त्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची व्यवस्थादेखील हवी, ‘एआयचा स्वीकार आणि वापर कसा होतो, हा निर्णयही तांत्रिक संघावर सोडण्याऐवजी नियमक, संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाने त्याचीही जबाबदारी घ्यावी, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुचविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.