राज्यात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला वेग

राज्यात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाला वेग
Published on

मुंबई, ता. १६ : राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘चला शाळेत जाऊया अभियान’ राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी याअंतर्गत गडचिरोली व नागपूर जिल्ह्यांतील शाळांना भेट दिली. तसेच संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांच्यासमवेत शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजना, शैक्षणिक व प्रशासकीय बाबी आदींबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी विभागातील सहसंचालक व उपसंचालक यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ८ व ९ सप्टेंबरला नियुक्त जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यांना भेटी देऊन शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली. पहिल्या दिवशी संबंधित जिल्ह्यातील तालुक्यांना भेट देऊन किमान दोन शाळांचा प्रत्यक्ष शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर तालुका व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेण्यात आल्या.

विविध उपक्रमांचे सर्वेक्षण
शाळा भेटीदरम्यान शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची स्थिती, शाळा व परिसराची स्वच्छता, क्रीडांगण व संरक्षक भिंत, वीज, आवश्यक फर्निचर, ई-सुविधा, विद्यार्थ्यांचे गणवेश, पोषण आहाराची गुणवत्ता व वेळेवर वितरण आदी बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि सर्वेक्षण अहवालांच्या आधारे आवश्यक सुधारणांचा आढावा घेण्यात आला.

दुसरा टप्पा २२ व २३ सप्टेंबरला
अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पालक अधिकारी व जिल्हा नोडल अधिकारी यांनी साधारणत: १५० शाळा भेटी करून शालेय प्रशासन, गुणवत्ता व शासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन आवश्यक ते मार्गदर्शन केले. अभियानाचा दुसरा टप्पा २२ व २३ सप्टेंबरला असून, त्यामध्येसुद्धा शाळा भेटी, तालुका व जिल्हास्तरीय आढावा बैठका आणि आवश्यक सुधारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com