

सात मार्गांवर वाहतूक बंद
गणेशोत्सवानिमित्त गर्दीचे नियोजन
मुंबई, ता. १२ : गणेशोत्सवानिमित्त लालबाग, परळ, काळाचौकी परिसरात होणारी गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत परिसरातील रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तर सात मार्गांवरील वाहतूक २४ तास तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
----
बंद असलेले मार्ग
डॉ. बी. ए. रोड, कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारतमाता जंक्शन) ते हंसराज राठोड चौक (बावला कंपाउंड जंक्शनपर्यंत), महादेव पालव मार्ग (करी रोड)- शिंगटे मास्तर चौक ते कॉम्रेड कृष्णा देसाई चौकापर्यंत (भारतमाता जंक्शन), संत जगनाडे महाराज चौक (गॅस कंपनी) येथे साने गुरुजी मार्गावरून डॉ. बी. ए. रोडकडे उजवे वळण बंद, दत्ताराम लाड मार्ग हा उडपी हॉटेल ते शांताराम पुजारी चौकदरम्यान वाहतुकीस बंद, गणेशनगर लेन (चिवडा गल्ली) डॉ. बी. ए. रोड जंक्शनपासून ते माधव प्रभू चौकातील पूजा हॉटेल जंक्शनपर्यंत वाहतुकीस बंद, दिनशॉ पेटीट लेनही डॉ. बी. ए. रोड जंक्शनपासून ते गणेशनगर लेन जंक्शनपर्यंत वाहतुकीस बंद, डॉ. एस. एस. राव रोड हा सदाशिव गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलिस चौकीपर्यंत वाहतुकीस बंद राहणार आहे.
----
नो-पार्किंग असलले रस्ते
डॉ. बी. ए. रोड, साने गुरुजी मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, गणेशनगर लेन (चिवडा गल्ली), दिनशॉ पेटीट लेन, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, जी. डी. आंबेकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, अनंत मालवणकर मार्ग, श्री साईबाबा मार्ग, टी. बी. कदम मार्ग, दत्ताराम खामकर मार्ग, तानाजी मालुसरे मार्ग, जीजीभाई मार्ग, महादेव पालव मार्ग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.