अतिवृष्‍टी झाल्‍यास उत्साहापेक्षा भाविकांची सुरक्षितता जपा

अतिवृष्‍टी झाल्‍यास उत्साहापेक्षा भाविकांची सुरक्षितता जपा
Published on

अतिवृष्‍टी झाल्‍यास उत्साहापेक्षा भाविकांची सुरक्षितता जपा
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १३ : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्साहापेक्षा भाविक, स्वयंसेवक आणि मंडपाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी रविवारी पत्रकाद्वारे हे आवाहन प्रसिद्ध केले.
​गणेशोत्सवादरम्यान अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना समितीने दिल्या आहेत. मंडपाची रचना, छत, ताडपत्री, लोखंडी स्ट्रक्चर, विद्युत जोडणी आणि जनरेटरची व्यवस्था यांची त्वरित पाहणी करावी तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी उघड्या तारा किंवा विद्युत उपकरणे राहणार नाहीत याची विशेष खबरदारी घ्यावी, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
​ गणरायाच्या भक्तांची सुरक्षितता जपणे हीसुद्धा गणरायाचीच सेवा आहे, असे सांगत ॲड. नरेश दहिबावकर यांनी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून शांत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

पोलिस, प्रशासनाशी समन्वय साधा!
समितीने केलेल्या सूचनामध्ये मंडप परिसरात जास्त पाणी साचल्यास किंवा संरचनेला धोका निर्माण झाल्यास भाविकांची गर्दी नियंत्रित करावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान मुसळधार पाऊस असल्यास केवळ परंपरा किंवा वेळेचा आग्रह न धरता, पोलिस व प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा. प्रत्येक मोठ्या मंडळाने आपल्या स्वयंसेवकांची स्वतंत्र आपत्कालीन टीम सज्ज ठेवावी. तसेच मुंबई महापालिका, पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करावी, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com