

दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या
सीडीओईमधील प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
मुंबई, ता, १५ : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रताधारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिकण्याची लवचिकता, परवडणारे शिक्षण शुल्क, यूजीसी (डीईबी) आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम हे सीडीओईची बलस्थाने आहेत.
दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे.
पदवी स्तरावरील अभ्यासक्रम
बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम (कॉमर्स, अकाउंटन्सी, आणि बीझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाउंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश असून, या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत.
पदव्युत्तर स्तरावरील विविध विषयांचे तसेच एमएमएस आणि एमसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश उपलब्ध आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत शुल्क अदा करून प्रवेश निश्चित करता येईल. ऑनलाइन प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सीडीओईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात मागील शैक्षणिक वर्षापासून एमए समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. तर या शैक्षणिक वर्षापासून डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (डीएसएम) हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सीडीओईमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ व अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापक या संस्थेत उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.