

प्लॅस्टिकच्या फुलांचा झगमगाट!
कमी दर, दररोज ताजी फुले आणण्याचे नो टेन्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोट्या-मोठ्या मंडळांनी मोठी मेहनत घेत आपल्या गणरायाचा दरबार सजवला आहे. मात्र त्या सजावटीमध्ये खऱ्याखुऱ्या फुलांना फारसे स्थान मिळालेले दिसत नाही. त्यांची जागा प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी फुलांनी घेतली आहे. झेंडू, गुलाब, चमेली आणि मोगऱ्याच्या फुलांचा बोलबाला आहे. खऱ्या फुलांच्या तुलनेत प्लॅस्टिकची फुले स्वस्त आणि टवटवीत दिसत असल्याने गणपती मंडळांकडून प्लास्टिक फुलांना पसंती दिल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत सण-उत्सव म्हटलं की झेंडू, मोगरा, गुलाब अशा फुलांना मनाचे स्थान असायचे; पण वाढलेली महागाई आणि कमी वेळेत झटपट सजावट करता यावी म्हणून काही वर्षांत फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक आणि कापडी फुलांना पसंती दिली जात आहे. ही फुले एकदा घेतली की १० दिवस वापरता येतात. धुता येतात, रंग उडत नाही आणि देखावाही आकर्षक दिसतो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबे यालाच पसंती देत असल्याचे सोमनाथ पाटील यांनी सांगितले. घरगुती गणपती आणि मंडळाच्या मंडपात सजावटीसाठी प्लॅस्टिकच्या फुलांचे आकर्षण असल्याचे जीवन महाडिक यांनी सांगितले.
दरम्यान, ताजी फुले ही केवळ सजावट नसून ती भक्ती आणि निसर्गाशी असलेले नाते आहे. कमी दराच्या मोहात खऱ्याखुऱ्या फुलांना दुय्यम स्थान देणे योग्य नसल्याचे अशोक पंडित यांनी स्पष्ट केले.
प्लॅस्टिक फुलांचे दर
- झेंडूच्या फुलांची माळ - २०-६० रुपये माळ
- मोगरा, जाईजुईच्या पांढऱ्या माळा - ३०-६० रुपये
- विस्टरीय हँगिंग फ्लॉवर्स - ६ माळांचा सेट - ३००-४०० रुपये
- गुलाबाची सुट्टी फुले - २५० रुपये (५० नग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.