

अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल
मागील वर्षापेक्षा १५ हजार १८१ प्रवेश संख्येत वाढ
मुंबई, ता. १५ : राज्यातील अभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात सीईटी सेलकडून अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱ्या व संस्थात्मक फेरी राबविली गेली. यानंतर राज्यातील एकूण ३८७ अभियांत्रिकी महाविद्यालयातून या अभ्यासक्रमाच्या एकूण दोन लाख २१ हजार ६४६ उपलब्ध जागेपैकी एक लाख ८१ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
मागील वर्षी २०२५-२६ मध्ये एक लाख ६६ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यानुसार मागील वर्षापेक्षा १५ हजार १८१ जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यात यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी २ जुलै २०२६ पासून सुरू झाली होती. १९ जुलैला ही ऑनलाइन नोंदणी संपली. यावर्षी दोन लाख ५१ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांसाठी राज्यात १७ विद्यापीठातील ३८७ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून, यामध्ये दोन लाख २१ हजार ६४६ जागा (व्यवस्थापन कोट्यासह) उपलब्ध आहेत. यापैकी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियामध्ये दोन लाख तीन हजार २९३ जागा उपलब्ध होत्या. संस्थात्मक फेरीअखेर एक लाख ८१ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या व संस्थात्मक फेरीअखेर शिल्लक राहिलेल्या एकॅप मधील २६ हजार ६८२ व व्यवस्थापन कोट्यातील २३६० अशा एकूण २९ हजार ०४२ जागा यावर्षी रिक्त राहिलेल्या आहेत.
--
फेरीनिहाय प्रवेश
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱ्या संपन्न झाल्या. यानंतर संस्थात्मक फेरी संपन्न झाली. यावर्षी फेरीनुसार प्रवेश किती झाले हे पहिले असता पहिल्या फेरीमध्ये ३१ हजार ६३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. यानुसार दुसऱ्या फेरीत ३० हजार ३०४, तिसऱ्या फेरीत २९ हजार ९२९ व चौथ्या फेरीत ४८ हजार ६८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. एकॅप प्रवेश प्रक्रियामध्ये २७ हजार ४७२, व्यवस्थापन कोट्याच्या फेरीत १३ हजार ४७३ व जम्मू-काश्मीर व एआयसीटीई कोट्यामध्ये १८९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.