प्लास्टिकविरोधी कारवाईचा धडाका

प्लास्टिकविरोधी कारवाईचा धडाका
Published on

प्लॅस्टिकविरोधी कारवाईचा धडाका
मुंबईत २९ लाख ठिकाणी धाडी; १२२ टन प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त
१६ महिन्यांत २४ प्रभागांमध्ये मोहीम
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १६ : पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आणि मुंबई प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या विविध विभागांनी २३ जून २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबईतील दुकाने, आस्थापना आणि बाजारांमध्ये तब्बल २९ लाख २८ हजार ७३२ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.
या कारवाईदरम्यान एक लाख २२ हजार ११३ किलोग्रॅम (सुमारे १२२ टन) प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, नियमभंग करणाऱ्यांकडून नऊ कोटी ४० लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ​महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभाग, अनुज्ञापन विभाग आणि बाजार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईअंतर्गत एकूण १८ हजार ७६८ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
​विभागांची कामगिरीचा विचार केला असता ​दुकाने व आस्थापना विभागाने सर्वाधिक नऊ लाख ५३ हजार ७३४ भेटी देऊन एक लाख एक हजार २७८ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त केले. या विभागाकडून १५ हजार २४८ प्रकरणांमध्ये सात कोटी ६४ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
​अनुज्ञापन विभागाने नऊ लाख ८५ हजार ६८२ ठिकाणी तपासणी करून १९ हजार ५५३ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. २,८२० प्रकरणांतून एक कोटी ४१ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर ​बाजार विभागाने नऊ लाख ८९ हजार ३१६ बाजारांतील गाळ्यांना भेटी देऊन एक हजार २८१ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करीत ७०० प्रकरणांतून ३५ लाखांचा दंड वसूल केला.
​दुकाने व आस्थापना विभागाने १ एप्रिल २०२५ ते ३१ जुलै २०२६ या १६ महिन्यांच्या काळात मुंबईतील २४ प्रभागांमध्ये (वॉर्ड) विशेष मोहीम राबवली. या कालावधीत एक लाख १५ हजार ८३० दुकाने व आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यात ७,५०५ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करून एक कोटी ३० लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात के-पश्चिम, के-पूर्व, एल आणि एम-पूर्व या वॉर्डांमध्ये सर्वाधिक जप्ती आणि कारवाईची नोंद झाली.
​व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी एकवार वापरल्या जाणाऱ्या (सिंगल यूज) आणि प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा अन्यथा यापुढील काळात कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा सक्त इशारा महापालिकेने दिला आहे.

एकूण कारवाई :
– कालावधी : २३ जून २०१८ ते ३१ जुलै २०२६
– ​एकूण धाडी : २९ लाख २८ हजार ७३२
– ​जप्त प्लॅस्टिक : एक लाख २२ हजार ११३ किलोग्रॅम
– ​वसूल दंड : नऊ कोटी ४० लाख ४० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com