

स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास ‘नारळ’
एसटीतील खासगी संस्थांबाबत परिवहनमंत्र्यांचा इशारा
मुंबई, ता. १६ : एसटी महामंडळातील बस स्थानके, परिसर, स्वच्छतागृहे व बसगाड्यांची स्वच्छता करण्यासाठी नेमलेल्या नव्या खासगी संस्थेकडून योग्य प्रकारे काम होत नसेल, तर त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करा, असे स्पष्ट निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
महामंडळाच्या मुख्यालयात नुकतीच यासंदर्भात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी, उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, सर्व खातेप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व राज्यातील सर्व विभाग नियंत्रक उपस्थित होते. या वेळी अनेक विभाग नियंत्रकांनी स्वच्छतेबाबत सरनाईक यांच्याकडे तक्रार केली. विशेषतः प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी संबंधित कंपनीने दिवसभरासाठी एकच व्यक्ती ठेवला आहे. त्याच्याकडून योग्य प्रकारे स्वच्छता होत नाही, अशी तक्रार केली. अनेक बस स्थानकांवर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यासाठी स्वच्छतागृहांसाठी किमान सहा व्यक्ती २४ तासांसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे; मात्र संबंधित कंपनीने याबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्या वेळी मंत्री सरनाईक यांनी महामंडळ आणि संबंधित संस्थेमध्ये झालेल्या करारानुसार, स्वच्छतागृहे दिवसभर स्वच्छ ठेवण्याचे काम संबंधित संस्थेचे असून, त्यात हयगय अजिबात सहन केली जाणार नाही. त्यांना तातडीने दोन महिन्यांची कारणे दाखवा नोटीस बजवावी. तोपर्यंत कामात सुधारणा न झाल्यास संंबंधित संस्थेचे कंत्राट रद्द करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
----
स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी आहेत. संबंधित कंपनीला नोटीस देऊन, करारातील नियम व अटींचे पालन न केल्यास कंत्राट रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.