खोपोलीकरांसाठी रात्रीच्या लोकलला ‘ब्रेक’!

खोपोलीकरांसाठी रात्रीच्या लोकलला ‘ब्रेक’!
Published on

खोपोलीकरांसाठी रात्रीच्या लोकलला ‘ब्रेक’!
पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने मध्यरात्री तीन तासांचा ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : खोपोलीकडे रात्री उशिरा जाणाऱ्या प्रवाशांना आता वेळेचे नियोजन करावे लागणार आहे. पळसदरी-खोपोलीदरम्यान रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी दोन महिने प्रत्येक गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री तीन तासांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशिराच्या प्रवाशांसाठी खोपोलीची शेवटची लोकल रात्री १०.५७ वाजताच सुटणार असून, एक लोकल रद्द आणि एक लोकल कर्जतपर्यंतच धावणार आहे.
१८/१९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून हा ब्लॉक सुरू होणार आहे. पुढील दोन महिने प्रत्येक गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री १.३० ते पहाटे ४.३० या वेळेत पळसदरी-खोपोलीदरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहील. त्यामुळे ब्लॉकच्या कालावधीत कर्जत-खोपोलीदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

रात्रीच्या लोकलचे वेळापत्रक
- रात्री १०.५७ - सीएसएमटीहून खोपोलीकडे जाणारी शेवटची लोकल
- रात्री ११.१८ - सीएसएमटीहून सुटणारी खोपोली लोकल कर्जतपर्यंतच धावणार
- रात्री ११.२० - खोपोलीहून कर्जतकडे जाणारी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल
- रात्री १२.३० - खोपोलीहून कर्जतकडे जाणारी लोकल रद्द
- पहाटे ४.५० - खोपोलीहून सीएसएमटीकडे जाणारी ब्लॉकनंतरची पहिली लोकल
- पहाटे ५.४३ - कर्जतहून खोपोलीकडे जाणारी ब्लॉकनंतरची पहिली लोकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com