

ब्लॉकमुळे टिटवाळ्याच्या चार लोकल रद्द
शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री टिटवाळ्यात पावणेदोन तासांचा ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : टिटवाळ्यातील पॉइंटच्या टॅम्पिंगसाठी शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री घेतलेल्या ब्लॉकमुळे चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर डोंबिवली आणि कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या दोन लोकल ठाण्यापर्यंतच धावणार आहेत. १८ सप्टेंबरच्या रात्री १२.४५ ते १९ सप्टेंबरच्या पहाटे २.१५ वाजेपर्यंत हा ब्लॉक राहणार असून, या काळात कल्याण-कसारादरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे.
या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून रात्री ११.१६ आणि ११.४२ वाजता टिटवाळ्याकडे सुटणाऱ्या तसेच टिटवाळ्याहून रात्री १०.२५ आणि ११.१४ वाजता ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. डोंबिवलीहून रात्री १० वाजता आणि कल्याणहून रात्री १०.०६ वाजता सीएसएमटीकडे सुटणाऱ्या लोकल ठाण्यापर्यंतच चालविण्यात येतील.
ब्लॉकपूर्वी शेवटच्या लोकल
कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटीहून रात्री १२.०८ वाजता, तर टिटवाळ्याकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १०.५० वाजता सुटेल. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल रात्री १० वाजता, तर आसनगावहून ठाण्याकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.०८ वाजता रवाना होईल.
ब्लॉकनंतर पहिल्या लोकल
ब्लॉकनंतर कसाऱ्याकडे जाणारी पहिली लोकल सीएसएमटीहून पहाटे ४.१९ वाजता सुटेल. सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल कसाऱ्याहून पहाटे ३.५१ वाजता आणि टिटवाळ्याहून ३.५६ वाजता रवाना होईल.
पॉइंटच्या टॅम्पिंगसाठी ब्लॉक
टिटवाळा येथील अप नॉर्थ-ईस्ट मार्गावरील पॉइंट क्रमांक १०९ आणि ११३बीच्या टॅम्पिंगचे काम या ब्लॉकमध्ये करण्यात येणार आहे. मार्गाची देखभाल आणि प्रवासी सुरक्षेसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, प्रवाशांनी बदललेल्या वेळांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.