यंदाच्या शैक्षणिक एमबीए-एमएमएसला झाले ४४ हजार ७८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश

यंदाच्या शैक्षणिक एमबीए-एमएमएसला झाले ४४ हजार ७८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश
Published on

एमबीए, एमएमएसला ४४ हजार ७८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश
- मागील वर्षापेक्षा २,१११ विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्येत वाढ
मुंबई, ता. १८ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६-२७ साठी एमबीए, एमएमएस या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या व संस्थात्मक फेरी राबविली गेली. यानंतर राज्यातील एकूण ४१२ एमबीए, एमएमएस महाविद्यालयांतून या अभ्यासक्रमांच्या एकूण ५६ हजार ९३१ उपलब्ध जागांपैकी ४४ हजार ७८८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मागील वर्षी २०२५-२६मध्ये ४२ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यानुसार मागील वर्षापेक्षा २,१११ हून जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
राज्यात यावर्षी एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी २ जुलै २०२६ पासून सुरू झाली होती. १९ जुलैला ही ऑनलाइन नोंदणी संपली. यावर्षी ५७ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांसाठी राज्यात ४१२ एमबीए, एमएमएस महाविद्यालयांमध्ये ५६ हजार ९३१ जागा उपलब्ध आहेत. यापैकी संस्थात्मक फेरीअखेर ४४ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या व संस्थात्मक फेरीअखेर शिल्लक राहिलेल्या ए कॅप मधील ११ हजार आणि व्यवस्थापन कोट्यातील १,१४३ अशा एकूण १२ हजार १४३ जागा यावर्षी रिक्त राहिलेल्या आहेत.
--
एमबीए, एमएमएसमध्ये मागील चार वर्षांतील प्रवेश
शैक्षणिक वर्ष झालेले प्रवेश
२०२६-२७ ४४,७८८
२०२५-२६ ४२,६७७
२०२४-२५ ४२,२०७
२०२३ -२४ ३७,०६३

फेरीनिहाय प्रवेश
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या पार पडल्या. यानंतर संस्थात्मक फेरी झाली. यावर्षी फेरीनुसार
प्रवेश किती झाले हे पाहिले असता, पहिल्या फेरीमध्ये १९ हजार ७८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. यानुसार दुसऱ्या फेरीत ११ हजार २२५, तिसऱ्या फेरीत ४,४१० आणि चौथ्या फेरीत २,८२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ए कॅप प्रवेश प्रक्रियामध्ये ४,४२२, ए कॅप अल्पसंख्याक कोट्यामध्ये ४६७, व्यवस्थापन कोट्याच्या फेरीत १,६४२ आणि जम्मू काश्मीर, एआयसीटीई कोट्यामध्ये १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या सर्व फेऱ्यांमध्ये ४४ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी एमबीए, एमएमएस महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे.

एमबीए, एमएमएसमध्ये फेरीनिहाय प्रवेशसंख्या
प्रवेश फेरी झालेले प्रवेश
प्रवेश फेरी - १ १९,७८३
प्रवेश फेरी - २ ११,२२५
प्रवेश फेरी - ३ ४,४१०
प्रवेश फेरी - ४ २,८२०
संस्थात्मक फेरी १,६४२
ए कॅप फेरी ४,४२२
ए कॅप अल्पसंख्याक फेरी ४६७
जम्मू काश्मीर व एआयसीटीई कोटा १९
एकूण झालेले प्रवेश ४४,७८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com