

अजगराने घेतला मांजरीचा बळी
मुंबई, ता. १८ : वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात घराजवळ आलेल्या ११ फूट लांबीच्या अजगराने शुक्रवारी सकाळी मांजरीला वेटोळे घातल्याने मृत्यू झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्रांनी वन विभागाला माहिती देत अजगराची सुरक्षितपणे सुटका केली.
शुक्रवारी सकाळी एका रहिवाशाने वापरा संस्थेचे सर्पमित्र अतुल कांबळे यांना फोन करून घराजवळ अजगराने मांजरीला पकडल्याची माहिती दिली. मांजरीचा जीव वाचविण्यासाठी तातडीने घटनास्थळी येण्याची विनंती रहिवाशाने केली. माहिती मिळताच कांबळे यांनी संबंधित वन विभागाचे राउंड ऑफिसर दीपक गायकवाड तसेच ठाणे-मुंबई रेंज कंट्रोल ऑफिसला घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असता अजगराने मांजरीला वेटोळे घातल्याचे आणि तिचा मृत्यू झाल्याचे आढळले. अजगर घराजवळ असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याला कोणतीही इजा न करता सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू करण्यात आले. या वेळी सर्पमित्रांनी नागरिकांना अजगराबाबत आवश्यक माहिती देत घराच्या परिसरात सापांना लपण्यासाठी पोषक ठरतील अशा वस्तू अथवा अडथळे ठेवू नयेत, असे आवाहन केले. रेस्क्यू केलेल्या अंदाजे ११ फूट लांबीच्या अजगराला वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि नियमानुसार त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.