गणेशोत्सवातील उत्तम नियोजनाप्रमाणेच वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा:

गणेशोत्सवातील उत्तम नियोजनाप्रमाणेच वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा:
Published on

वायुप्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

​मुंबई, ता. १८ : गणेशोत्सव व पावसाळ्यात महापालिकेने केलेल्या उत्तम नियोजनाप्रमाणेच आगामी काळात शहरात वायुप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम नियोजन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे आणि ‘पादचारी प्रथम’ अभियानात सातत्य ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
​महापालिका मुख्यालयात शुक्रवारी (ता. १८) विविध विभाग, खात्यांचे कामकाज, प्रकल्प आणि उपक्रमांबाबत मासिक आढावा बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. विपिन शर्मा, अभिजित बांगर, डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नियंत्रणात असला तरी आगामी काळात त्यात वाढ होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पालिकेने जारी केलेल्या २८ मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, असे सांगतानाच १ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विशेष मोहीम राबवून रस्ते धुणे आणि बांधकाम प्रकल्पांवर आवरणे घालण्याचे आदेश त्यांनी दिले. मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘नोडल अधिकारी’ नेमण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
सुलभ पदपथांसाठी पालिकेने सुमारे ३०७ किलोमीटर लांबीच्या २०० पदपथांची निवड केली असून या अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. हे काम अधिक व्यापक करण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, नागरी तक्रारी निवारणासाठी सुरू केलेल्या ‘मार्ग’ प्रणालीवर प्राप्त ८७ हजार चार तक्रारींपैकी सुमारे ६४ टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. उर्वरित तक्रारी ज्या स्तरावर अपेक्षित आहेत, तिथेच तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले.

​कोंडीवर तोडगा काढण्याचे निर्देश
शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे १३९ अडथळ्यांचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत. तेथील अनधिकृत किंवा अडथळा ठरणारी बांधकामे रीतसर हटवून वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच विविध विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्यांची यादी वेळेत सादर करून रस्ते, पूल व पर्जन्य जलवाहिन्यांची कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश परिमंडळ उपआयुक्तांना देण्यात आले आहेत.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com