आयटी शेअरविक्रीमुळे बाजारात संमिश्र कल

आयटी शेअरविक्रीमुळे बाजारात संमिश्र कल
Published on

आयटी शेअरविक्रीमुळे बाजारात संमिश्र कल
सेन्सेक्स १९ अंशांनी घसरला, तर निफ्टी ७५ अंशांनी वाढला

मुंबई, ता. १८ : कच्च्या तेलाच्या भावातील घसरण आणि आशियाई बाजारांतील सकारात्मक संकेतांमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीला तेजी दिसली, मात्र व्यवहाराच्या अखेरच्या टप्प्यात आयटी क्षेत्रातील आणि टाटा समूहातील शेअरमध्ये झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्स घसरणीसह, तर निफ्टी वाढीसह बंद झाला. निफ्टीने सलग तिसऱ्या सत्रातील वाढ नोंदवली गेली.

दिवसअखेर सेन्सेक्स १९.६३ अंशांनी घसरून ७४,२९४.९६ अंशांवर बंद झाला, तर निफ्टी ७५.८० अंशांनी वाढून २३,३४६.४० अंशांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्स ४१३.८५ अंशांनी वाढून ७४,७२८.४४ अंशांवर पोहोचला होता, मात्र ही पातळी त्याला टिकवता आली नाही. सेन्सेक्समधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा शेअर ४.३३ टक्के घसरला. टायटन २.११ टक्के, एशियन पेंट्स दोन टक्के, मारुती १.९८ टक्के, टेक महिंद्रा १.८२ टक्के आणि टाटा स्टील १.७३ टक्के घसरले. अदाणी पोर्टस, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेलमध्ये वाढ झाली. स्मॉल कॅप निर्देशांक १.५६ टक्के आणि मिड कॅप निर्देशांक ०.७९ टक्के वाढला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आयटी १.३४ टक्के, कन्झ्युमर ड्युरेबल्स १.२७ टक्के आणि एफएमसीजी ०.५२ टक्के घसरले. सेवा क्षेत्र १.७३ टक्के आणि औद्योगिक क्षेत्र १.७० टक्के वाढले.

..
कच्च्या तेलाच्या भावातील नरमाई आणि जागतिक रोख्यांच्या उत्पन्नातील घट यामुळे जोखीम घेण्याची क्षमता वाढली, मात्र भू-राजकीय अनिश्चितता कायम आहे. आयटी शेअरमध्ये नफावसुली झाली असून, दीर्घकाळ उच्च व्याजदर राहिल्यास जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील खर्चावर परिणाम होण्याची चिंता आहे.
- विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com