आयआयटी मुंबईत बीटेकच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आयआयटी मुंबईत बीटेकच्या 
विद्यार्थ्यांची आत्महत्या
Published on

आयआयटी मुंबईत बी.टेक.च्या
विद्यार्थ्याची आत्महत्या
आयआयटी प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन

मुंबई, ता. १८ : आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा शुक्रवारी (ता. १८) संध्याकाळी वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केल्याचे आढळल्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले होते; त्यानंतर तो वसतिगृहात मृतावस्थेत आढळल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले. या विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी प्रशासनाने पोलिस आणि इतर सुरक्षा दलाची मदत घेतली.

आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याला आजच्या मध्य-सत्र परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना डीनच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पकडले आणि त्याला परीक्षा कक्षातून बाहेर काढले. तसेच त्याला एका वर्षासाठी निलंबित करण्याचा इशारा देण्यात आल्याने त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. आंदोलन शांत होत नसल्याचे लक्षात आल्याने आयआयटीचे संचालक प्रो. शिरीष केदारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी त्यांना जागेवर धारेवर धरून प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्याला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला.

आज एका परीक्षेदरम्यान हा विद्यार्थी परीक्षा कक्षात मोबाईल फोन वापरताना आढळून आला. उत्तरे मिळवण्यासाठी त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती. या प्रकरणावर संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्याशी चर्चा केली. त्यांनी त्याचे समुपदेशन केले आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी खात्री दिली हाेती. त्यानंतर विद्यार्थी वसतिगृहातील खोलीत परतला. संध्याकाळी उशिरा तो आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला असल्याचे आयआयटी प्रशासनाने स्पष्ट केले. या मृत्यूशी संबंधित परिस्थितीची योग्य त्या प्राधिकरणांकडून चौकशी केली जात असल्याचे आयआयटी मुंबईकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com