

मेट्रो-४च्या बांधकामात
कंत्राटदाराकडून निष्काळजी
कंत्राटदार, सल्लागाराला सहा कोटी रुपयांच्या दंडाचा दणका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मेट्रो-४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराकडून सातत्याने सुरक्षेच्या बाबतीत निष्काळजी केली जात आहे. नुकतेच वडाळा भक्ती पार्क येथे बांधकाम साईटवर झालेल्या अपघातात दोन कामगारांचा बळी गेला आहे. त्याची गंभीर दखल घेत एमएमआरडीएने कंत्राटदार आणि सल्लागाराला सहा कोटी रुपये दंडाचा दणका दिला आहे.
भक्ती पार्क येथे १२ सप्टेंबरला पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर उतरत असताना लोखंडी स्टेजिंगचा (कामगारांना ये-जा करण्यासाठी उभारलेली लोखंडी संरचना) भाग अचानक कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत एमएमआरडीएने घटनेची सविस्तर तपासणी करून जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामध्ये कंत्राटदार मे. आर इन्फ्रा-अस्ताल्डी जेव्ही यांच्यावर पाच कोटी रुपये, तर जनरल कन्सल्टंट समूहातील मे. डीबी इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग, हिल इंटरनॅशनल इन्क आणि लुईस बर्जर कन्सल्टिंग प्रा.लि. यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सर्व कंत्राटदार, उपकंत्राटदार आणि सल्लागारांना आवश्यक सुरक्षा प्रक्रिया, वैधानिक नियम आणि करारातील अटींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.