माझ्या मुलाला छळ करून मारले

माझ्या मुलाला छळ करून मारले
Published on

माझ्या मुलाला छळ करून मारले
आईचा गंभीर आराेप; प्रकरणाच्या चाैकशीची मागणी

आयआयटी मुंबई आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : आयआयटी मुंबईत आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या आईने शनिवारी गंभीर आराेप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. ‘माझ्या मुलाचा छळ करून त्याचा खून करण्यात आला आहे. मला न्याय हवा,’ असा टाहाे त्याच्या आईने फाेडला. दरम्यान, विद्यार्थी संघटनांनी या प्रकरणाच्या सखाेल चाैकशीची मागणी केली आहे.

आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असलेल्या साहिल रवींद्र वाकाेडे (वय २२, रा. यवतमाळ) याने वसतिगृहात शुक्रवारी सायंकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी पवई पाेलिसांत अपघाती मृत्यूची नाेंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या विद्यार्थ्याकडे काेणतीही चिठ्ठी सापडलेली नाही, असेही पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
आयआयटी मुंबईच्या निवेदनानुसार, त्याला त्याच दिवशी परीक्षागृहात मोबाईल वापरताना पकडण्यात आले होते. त्याने परीक्षेतील प्रश्नपत्रिका उत्तरे मिळविण्यासाठी चॅटजीपीटीवर अपलोड केल्याचेही संस्थेने म्हटले आहे; मात्र त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती. संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांनी त्याच्याशी चर्चा करून समुपदेशन केले होते.
-------------------
सात महिन्यांत तिसरी घटना
सात महिन्यांत पवई येथील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे. फेब्रुवारीत द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केली हाेती. त्यानंतर जुलै २०२६ मध्ये नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला बीटेकच्या द्वितीय वर्षातील २० वर्षीय विद्यार्थ्यानेही आत्महत्या केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com