गणेशोत्‍सवातील आठवणींचे डिजिटल दस्तऐवजीकरण

गणेशोत्‍सवातील आठवणींचे डिजिटल दस्तऐवजीकरण
Published on

गणेशोत्‍सवातील आठवणींचे डिजिटल दस्तऐवजीकरण
उपक्रमात सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २० : मुंबईतील श्रीगणेशोत्सवाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, धार्मिक प्रथा, कौटुंबिक आठवणी आणि सामाजिक उपक्रम डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘Bappa.org’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या डिजिटल उपक्रमात मुंबईतील नागरिक, गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे आणि मंदिर न्यासांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
​श्रीगणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. मुंबईतील घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये वर्षांनुवर्षे अनेक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जोपासल्या जात आहेत. या वैविध्यपूर्ण प्रथा, कलात्मक देखावे आणि कौटुंबिक आठवणींचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून ते पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून देणे हा ‘Bappa.org’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
​पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती, कलात्मक देखावे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम डिजिटल स्वरूपात एकत्र आल्यामुळे मुंबईच्या सांस्कृतिक वैविध्याचे जतन होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्व मुंबईकरांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राच्या या समृद्ध वारशाचे डिजिटल संवर्धन करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

उपक्रमाची थोडक्‍यात माहिती
नागरिक आपल्या घरातील अथवा सार्वजनिक श्रीगणेशोत्सवातील श्रीगणेशमूर्ती, सजावट, आरत्या, कौटुंबिक आठवणी, पारंपरिक पाककृती, ऐतिहासिक संदर्भ, पर्यावरणपूरक उपक्रम आणि सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांचे फोटो व व्हिडिओ नोंदवू शकतात. इच्छुकांनी ‘Bappa.org’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या श्रीगणेशमूर्तीचे किंवा देखाव्याचे छायाचित्र अपलोड करावे आणि त्यासोबत आपल्या परंपरेची अथवा उपक्रमाची थोडक्यात माहिती नोंदवावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com