तीन महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

तीन महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश
Published on

मुंबई, ता. २० : वीज चोर महावितरणच्या रडारवर आले असून, वाढत्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी रोखण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सुरू केला आहे. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांत १९० भरारी पथकांच्या तपासणीत २७,९६४ वीजचोऱ्या उघड झाल्या असून, ६६ कोटी २८ लाखांची वीजचोरी समोर आली आहे.

महावितरणने चोरांचा शोध घेण्यासाठी पारंपरिक तपासणीला हायटेकची जोड देत एआय आणि मशीन लर्निंगवर आधारित माॅड्यूल विकसित केले आहे. हे माॅड्यूल ग्राहकांचा वीज वापराचा आलेख, अचानक घटलेली मागणी, मीटरमधील फेरफार अशा ५० हून अधिक निकषांवर २४ तास विश्लेषण करते. संशयास्पद वापर आढळल्यास ग्राहकाला ‘हाय-रिस्क’ श्रेणीत टाकून थेट चोरीचे ठिकाण अचूक मिळते.

२९.८५ कोटींची वसुली
जून ते ऑगस्टदरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागात ५,०८३, कोकणात ११,०८३, नागपुरात ५,९४९ आणि पुण्यात ५,८४९ अशा एकूण २७,९६४ चोऱ्या उघड झाल्या. त्यापैकी २४,५०८ प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण होऊन बिले देण्यात आली आहेत. आतापर्यंत १०,८१० प्रकरणांत २९.८५ कोटींची वसुली झाली आहे. रक्कम न भरलेल्या २८९ प्रकरणांत कलम १३५ अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com