ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांची घरघर संपणार

ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांची घरघर संपणार
Published on

ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांची घरघर संपणार
दोन विंगला ओसी मिळाली; ३४२ सदनिकांच्या वितरणाचा मार्ग मोकळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : वरळी आणि नायगाव बीडीडीवासीयांना घरांचा ताबा मिळाल्याने आम्हाला हक्काचे घर कधी मिळणार, असा सवाल करणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांची घरघर संपणार आहे. येथील पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील दोन विंगला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले आहे. त्यामुळे ३४२ सदनिकांच्या चावी वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संबंधित रहिवाशांना चावी वाटप केले जाण्याची शक्यता आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प म्हाडाकडून राबवला जात असून, त्याअंतर्गत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार वरळी आणि नायगाव बीडीडीवासीयांना घरांचा ताबा दिला आहे. त्यामुळे ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांना घराची प्रतीक्षा होती. ती आता संपणार आहे. ना. म. जोशी मार्ग येथील ३२ चाळींमधील २,५६० रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी २३ मजल्यांचे १४ टाॅवर उभारण्याचे काम वेगाने सुरू असून, त्यामधील इमारत क्रमांक १ मधील दोन विंगचे काम पूर्ण झाले आहे. त्याला ओसी मिळाल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तिसऱ्या विंगच्या फिनिशिंगचे काम जोरात
पुनर्वसन इमारत क्र. १ मध्ये ई, एफ, जी या तीन विंगचे काम झाले असून, त्यामध्ये ५५७ सदनिका आहेत. मात्र एफ विंगच्या फिनिशिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ओसी मिळालेल्या ई, एफ विंगमधील सदनिकांचे वितरण करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. एफ विंगचे फिनिशिंगचे काम झाल्यानंतर त्यामधील २१५ रहिवाशांनादेखील महिनाभराच्या आत घराचा ताबा देण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com