विनातिकीट प्रवास महागात

विनातिकीट प्रवास महागात
Published on

विनातिकीट प्रवास महागात
पाच महिन्यांत मध्य रेल्वेची १४० कोटी दंडवसुली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत तिकीट तपासणी मोहिमेत चांगलाच झटका दिला आहे. तपासणी मोहिमेत १८.०३ लाख प्रवासी आढळून आले असून, त्यांच्याकडून तब्बल १४०.८१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दररोज सरासरी ११ हजारांहून अधिक प्रवासी तिकीटविना किंवा अनियमित प्रवास करताना कारवाईच्या कक्षेत आले.

गेल्या वर्षी याच पाच महिन्यांत १७.१९ लाख प्रवाशांकडून १००.५० कोटी रुपये दंड वसूल झाला होता. यंदा प्रवाशांची संख्या सुमारे पाच टक्क्यांनी वाढली असून, दंडवसुली तब्बल ४० कोटी रुपयांनी वाढली आहे. तिकीट तपासणी अधिक कडक केल्याने कारवाईचा आकडा वाढल्याचे चित्र आहे.

मुंबई विभागातून सर्वाधिक वसुली
विभागनिहाय कारवाईत मुंबई विभाग आघाडीवर राहिला. ८.८० लाख प्रकरणांतून ५८.४६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. भुसावळ विभागातून ३५.५२ कोटी, तर पुणे विभागातून १६.२९ कोटी रुपयांची दंडवसुली झाली.

ऑगस्टमध्ये १९.५० कोटींचा दंड
ऑगस्टमध्ये २.५७ लाख प्रवाशांवर कारवाई करून १९.५० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गतवर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत दंडवसुलीत ४१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तिकीट तपासणीच्या विशेष मोहिमा सुरू असून, प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com