

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : डिमेन्शिया आणि अल्झायमरच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईत बहुविशेषज्ञ पद्धतीने कार्य करणाऱ्या ‘मेमरी क्लिनिक’ची सुरुवात करण्यात आली आहे. ग्लेनेगेल्स रुग्णालयाच्या क्लिनिकमध्ये केवळ आजाराचे निदान न करता रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचार, समुपदेशन, पुनर्वसन तसेच दीर्घकालीन मार्गदर्शन देण्यावर भर दिला जाणार आहे.
केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, त्यांनी २०२२ पासून केईएम रुग्णालयात मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून काम करताना आतापर्यंत डिमेन्शियाच्या ३५७ हून अधिक रुग्णांना पाहिले आहे. डिमेन्शियाचे निदान झाल्यानंतर अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढे काय करावे, कोणाकडे जावे आणि रुग्णाची काळजी कशी घ्यावी, याबाबत पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे निदानानंतरच्या संपूर्ण प्रवासात रुग्ण आणि कुटुंबीयांना ‘हँडहोल्डिंग’ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जगभरात दर सुमारे ३.२ सेकंदाला डिमेन्शियाचा एक नवा रुग्ण आढळत असल्याचा संदर्भ देत डॉ. रावत यांनी वाढत्या आयुर्मानामुळे भविष्यात डिमेन्शियाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. भारतातील २०२० मधील अभ्यासानुसार ६० वर्षांवरील सुमारे ७.४ टक्के व्यक्तींमध्ये डिमेन्शिया आढळतो, असेही त्यांनी सांगितले.
या मेमरी क्लिनिकमध्ये न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसायकॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, आहारतज्ज्ञ आणि पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली बहुविशेषज्ञ टीम कार्यरत असेल. रुग्णांच्या स्मरणशक्ती व संज्ञानात्मक क्षमतेचे सविस्तर परीक्षण, आवश्यक इमेजिंग आणि रक्तचाचण्या करून डिमेन्शियाचे कारण निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अल्झायमरचे लवकर निदान महत्त्वाचे
अल्झायमर हा केवळ स्मरणशक्तीशी संबंधित आजार नसून त्याचा परिणाम दैनंदिन कामे, आर्थिक व्यवहार, परिचित ठिकाणी मार्ग शोधणे आणि इतर संज्ञानात्मक क्षमतांवरही होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
मुंबई : मान्यवरांच्या हस्ते ‘मेमरी क्लिनिक’ची सुरुवात करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.