

मुंबईकरांची पाण्याची चिंता दूर
सात तलावांत तब्बल ९७.७७ टक्के पाणीसाठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मध्य वैतरणा हा तलाव १०० टक्के भरून वाहू लागला आहे, तर सर्वात मोठा असलेला भातसा तलाव ९९.४६ टक्के भरला आहे. परिणामी मुंबईकरांवरील पाण्याचे संकट टळले असून, पुढील वर्षीच्या २४ ऑगस्ट २०२७ पर्यंत (३४५ दिवस) पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा तलावांमध्ये जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
विहार, तुळशी, तानसा आणि मोडक सागर हे चार तलाव यापूर्वी जुलैमध्ये भरले होते. तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गणेशोत्सवाच्या काळात तलाव क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मध्य वैतरणा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. आता केवळ अप्पर वैतरणा तलाव भरणे बाकी असून, त्यातही ९५.७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला सात तलावांमधून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. अल निनोचा प्रभाव आणि अनियमित पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच पाण्याचे नियोजन केले आहे, मात्र सध्या रहिवासी क्षेत्रात १० टक्के आणि व्यावसायिक क्षेत्रात २० टक्के पाणीकपात लागू आहे. परतीचा पाऊस आणि तलावांची सद्यःस्थिती पाहता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
जलसाठ्याची स्थिती (२१ सप्टेंबर २०२६ पर्यत सकाळी ६ वा.)
तलावाचे नाव पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) (टक्क्यांमध्ये)
अप्पर वैतरणा २,१७,४०४ ९५.७५
मोडक सागर १,१२,००६ ८६.८८
तानसा १,४३,०६३ ९८.६१
मध्य वैतरणा १,९३,६४१ १००.००
भातसा ७,१३,१९६ ९९.४६
विहार २७,६९८ १००.००
तुळशी ७,९६९ ९९.०५
एकूण साठा १३,३४,९७९ ९७.७७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.