ध्वनीप्रदूषणावर आज तातडीची सुनावणी

ध्वनीप्रदूषणावर आज तातडीची सुनावणी
Published on

ध्वनिप्रदूषणावर आज तातडीची सुनावणी
उच्च न्यायालयाची स्वतःहून दखल 
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २१ : गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २१) स्वतःहून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने या काळातील अनियंत्रित गोंगाटावर नाराजी व्यक्त केली. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सरकारने काय कारवाई केली? गतवर्षीचा आणि यंदाचा सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश देत मंगळवारी (ता. २१) सुनावणी सूचीबद्ध केली. 
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने दैनंदिन न्यायालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. या वेळी न्यायालयाने गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. कोणत्याही धर्माला किंवा सणांना आमचा विरोध नाही; मात्र सण साजरे करताना अन्य कोणालाही त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.  
---
प्रश्नांची सरबत्ती
सध्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळले जात आहेत का? आवाजाच्या मर्यादेबाबत काही नियमावली केली आहे का? त्याची अंमलबाजवणी होत आहे का? नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई केली? गेल्या वर्षी परिस्थिती काय होती? याबाबतचा सर्व तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महाधिवक्त्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com