सिप्लाच्या गोदामाचा परवाना रद्द

सिप्लाच्या गोदामाचा परवाना रद्द
Published on: 

सिप्लाच्या गोदामाचा परवाना रद्द
गंभीर त्रुटींमुळे एफडीएची कारवाई

मुंबई, ता. २ : औषधाच्या पॅकेजिंगवरील उपचारासंदर्भातील दावे तसेच औषध साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वडकी येथील सी अँड एफ गोदामाचा औषध विक्री-वितरण परवाना रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १ ऑक्टोबरला हा निर्णय घेण्यात आला.
एफडीएच्या तपासणीत गोदामात ‘रिॲक्टिन प्लस’ या अनुसूची एच औषधाचा साठा आढळला. त्याच्या पॅकेजिंगवर डोकेदुखी, स्नायुदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, मुरगळणे, अंगदुखी आणि दातदुखीवर त्वरित आराम मिळतो, असे दावे करण्यात आले होते. तसेच कार्टनवर मानवी आकृतीद्वारे स्नायूंचे दुखणे कमी होत असल्याचे चित्रण होते. हे दावे, मजकूर आणि चित्रण संबंधित वैधानिक तरतुदींशी विसंगत असल्याचे एफडीएने नमूद केले. गोदामातील साठवणुकीतही त्रुटी आढळल्या. कंपनीने लेखी उत्तर आणि वैयक्तिक सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडली. मात्र केवळ संगणकीय किंवा एसएपी प्रणालीतील नोंदी असल्याने वैधानिक अभिलेख, प्रत्यक्ष साठा, योग्य साठवणूक, स्वच्छता आणि आवश्यक कागदपत्रांची जबाबदारी टाळता येणार नाही, असे परवाना प्राधिकरणाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पूर्वीची कार्यवाही मागे घेऊन ४ सप्टेंबरला सुधारित कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कंपनीने ११ सप्टेंबरला उत्तर दिले, तर २१ सप्टेंबरला वैयक्तिक सुनावणी झाली. सर्व बाबींचा विचार करून परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
...
औषधांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि पुरवठा साखळीतील वैधानिक अनुपालन सुनिश्चित करणे हे एफडीएचे उद्दिष्ट असून, या प्रक्रियेत नैसर्गिक न्यायतत्त्वे, पारदर्शकता, सुनावणीची संधी आणि कारणयुक्त निर्णय यांचे पालन करण्यात आले.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com