

वायुदलासाठी विमान निर्मिती
महिंद्र समूहाची ‘एम्ब्रेअर’सह भागीदारी
मुंबई, ता. २ : भारतीय हवाई दलाच्या मध्यम मालवाहू विमान निर्मिती कार्यक्रमासाठी महिंद्र समूह आणि एम्ब्रेअर संयुक्तपणे सी ३९० मिलेनियमची निर्मिती करण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई येथे गुरुवारी झालेल्या इन्व्हेस्ट महाराष्ट्र कार्यक्रमात महिंद्र समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शहा यांनी ही माहिती दिली. त्यांच्या याबाबत सुरू असलेल्या तयारीचा एक भाग म्हणून महिंद्रा आणि ‘एम्ब्रेअर’ने महाराष्ट्र सरकारला तसा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी भारतात एम्ब्रेअर सी ३९० मिलेनियम विमानांच्या उत्पादन प्रकल्पासाठी नागपूरची निवड केली आहे. हे काम या भागीदारांना मिळाल्यास आवश्यक औद्योगिक पायाभूत सुविधांचे काम वेगाने पुढे जाऊ शकेल, या उद्देशाने संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या कंपन्या महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करीत आहेत, असे महिंद्र समूहाचे संचालक विनोद सहाय यांनी सांगितले. केंद्र सरकारने या विमान निर्मिती प्रकल्पासाठी आमच्या समूहाची निवड केल्यास आम्ही हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करू, असेही ते म्हणाले
..
विमानाची वैशिष्ट्ये
सी ३९० मिलेनियम हे एक बहुउद्देशीय लष्करी वाहतूक विमान आहे. ते सैन्य आणि मालाची वाहतूक, हवाई मोहिमा, वैद्यकीय मदत, शोध व बचाव, आग नियंत्रण आणि आपत्कालीन मानवतावादी मोहिमांसह अनेक प्रकारची कामे करण्यासाठी तयार केले आहे. या विमानाची भार वाहून नेण्याची क्षमता २६ टनांपर्यंत आहे आणि ते तात्पुरत्या किंवा कच्च्या धावपट्टीवरून उड्डाण करू शकते व उतरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.