रस्ते धुण्यासाठी पाण्याचा पाण्याची उधळपट्टी!

रस्ते धुण्यासाठी पाण्याचा पाण्याची उधळपट्टी!
Published on: 

रस्ते धुण्यासाठी पाण्याची बेसुमार नासाडी!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : एकीकडे पाणीगळती आणि दुरुस्तीच्या नावाखाली मुंबईकरांवर वारंवार पाणीकपात लादायची आणि दुसरीकडे रस्ते धुण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाण्याची बेसुमार नासाडी करायची, असा महापालिकेचा दुटप्पी कारभार समोर आला आहे. शहरातील धूळ नियंत्रणात आणण्यासाठी प्रमुख रस्ते उच्च दाबाच्या पाण्याचे टँकर वापरून (जेटिंग सिस्टीम) धुण्याचा अजब घाट पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घातला आहे. यासाठी ७ परिमंडळांत टँकर भाड्याने घेण्यासाठी तब्बल आठ कोटी २४ लाख रुपयांचे कंत्राट मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहे.

महापालिकेने २६ विभागांमधील ६५७ किमी लांबीचे ३७७ रस्ते धुण्यासाठी निवडले आहेत. पावसाळा वगळून १५० दिवसांसाठी २ ते १० हजार लिटर क्षमतेचे टँकर भाड्याने घेऊन लाखो लिटर पाणी थेट रस्त्यांवर ओतले जाणार आहे. धूळ रोखण्यासाठी आधुनिक मेकॅनिकल स्वीपिंग किंवा शास्त्रोक्त झाडलोटीचा वापर करण्याऐवजी थेट पाण्याचा अपव्यय करण्याच्या या भूमिकेवर पर्यावरणतज्ज्ञांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकीकडे जल अभियंता विभाग वर्षभर ‘पाणी वाचवा’च्या जनजागृतीवर लाखो रुपये उधळतो, तर दुसरीकडे घनकचरा विभाग त्याच पाण्याची रस्त्यांवर नासाडी करीत आहे. यावरून पालिका प्रशासनात अंतर्गत समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे. ‘महाराष्ट्र ई-व्हेइकल धोरणा’नुसार शासकीय कामात इलेक्ट्रिक वाहने वापरणे बंधनकारक आहे. मात्र ई-टँकर उपलब्ध नसल्याचे कारण देत प्रदूषण वाढवणारे डिझेल टँकरच रस्त्यावर उतरवले जाणार आहेत.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com