‘बाणगंगे’साठी नागरिकांनीही सहकार्य करावे

‘बाणगंगे’साठी नागरिकांनीही सहकार्य करावे
Published on: 

‘बाणगंगे’साठी नागरिकांनीही सहकार्य करावे
मंगलप्रभात लोढा यांचे पर्यावरणपूरक पिंडदानाचे आवाहन
​
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वाळकेश्वर येथील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या बाणगंगा तलावातील दूषित पाण्यामुळे मासे मृत पावल्याची घटना घडल्यानंतर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी महापालिकेच्या ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पितृपक्षाच्या काळात हजारो भाविक बाणगंगा तलावावर पिंडदानासह विविध धार्मिक विधींसाठी येतात. विधीदरम्यान तलावाच्या पाण्यात तेल, तूप, गोड पदार्थ आणि इतर साहित्य सोडले जात असल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन जलचरांचा जीव धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, तलावाचे पावित्र्य जपण्यासाठी आणि जलजीवांच्या संरक्षणासाठी महापालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने विधी पार पाडावेत, असे आवाहन लोढा यांनी केले. तलावातील पाण्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी पंपांची संख्या वाढवली जाणार असून, गर्दीचे नियोजन व स्वच्छतेसाठी परिसरात १० कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत स्थानिक कार्यकर्त्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

बाणगंगा तलावाला मोठे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. पूर्वजांचे स्मरण आणि धार्मिक परंपरा जपत असतानाच पर्यावरणाचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. नागरिकांनी पाण्यात तेल किंवा खाद्यपदार्थ न टाकता प्रशासन आणि महापालिकेला सहकार्य करावे.
- मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com